fbpx
We are Online Market of organic fruits, vegetables, juices and dried fruits. Visit site for a complete list of exclusive we are stocking.

Usefull links

Contact us

My Cart
 0.00
Blog

आणि आता आली ‘इन्सुलिन टी पावडर’

टाइप-२ मधुमेहाच्या परिणामांवर मात करण्या‍साठी सर्व नैसर्गिक उत्पादने स्वदेशात विकसित करुन आयुरा ओरिजिन्स, गौर अग्रो प्रोडक्टस् प्रा.लि. या ब्रॅंडने ‘दि इन्सुलिन टी’ पावडर पहिल्यांदा बाजारात आणली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या् अंदाजानुसार भारतात ७० दशलक्षाहून अधिक टाइप-२ मधुमेहाचे रुग्ण आहेत. गंभीर स्वरूपाची जीवनशैली आणि चुकीच्या अन्नपदार्थांचे सेवन करण्याच्या सवयींचा हा परिणाम आहे, जो वाढतच आहे आणि यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी असे बिरूद मिळाले आहे. चेन्नईला भारतातील मधुमेहाची राजधानी म्हणतात जिथे टाइप-२ मधुमेहाचे रुग्ण अधिक आहेत. टाइप-२ मधुमेहाचा उपचार करणे इतक्यापुरते हे मर्यादित नाही तर या रुग्णांना अंधत्व आणि मूत्रपिंडाच्या व्याधींनाही तोंड द्यावे लागते. डॉ. मिकीता गांधी, मधुमेह प्रशिक्षक, मुख्य आहारतज्ञ, बीम्सा आणि निरॉन हॉस्पिटल टाइप-२ मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीच्या पर्यायी नियंत्रण पद्धतींचा वापर करण्याविषयी बोलताना म्ह‍णाल्या की, इन्सुलिन टी पावडर ही पूर्णपणे नैसर्गिक उत्पादन आहे आणि टाइप-२ मधुमेह रुग्णांना दैनंदिन सेवनासाठी सुरक्षित आहे. प्रतिबंधक उपाय म्ह्णून इन्सुालिन टी पावडरचा वापर करता येणार नाही. टाइप-२ मधुमेहाचे निदान झाल्या‍नंतरच याचे सेवन करता येईल. आयुरा ओरिजिन्सच्या सर्वेक्षणात नियमित ग्राहकांच्या् प्रतिक्रियेवरुन या उत्पादनाच्या ९० दिवसांच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेच्या पातळीत घट झाल्या्चे दिसते आणि ६ महिने याचे नियमित सेवन केल्यास हे प्रमाण सामान्य पातळीवर येते हे स्पष्ट झाले आहे. मनु गोर, संचालक, गोर अॅग्रो प्रोडक्टस् प्रा.लि. यांनी सांगितले की, ‘’कोस्टास इग्नरस इन्सुीलिन टी हे उत्पादन प्रक्रियेअधीन आहे, आम्हा्ला त्याची संपूर्ण कार्यक्षमता जाणून घ्यायची आहे आणि म्हणूनच आम्ही वैयक्तिकरित्या टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांवर लक्ष देत आहोत. याचे खुप प्रभावी परिणाम दिसून येत आहेत. याच्या सेवनामुळे रक्तातील सारखेच्या प्रमाणात सतत घट होत आहे आणि सातत्या्ने त्यावर दिर्घकाळ नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करत एक वर्षभर या उत्पादनाचे सेवन करत निरीक्षण केले असता रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर झाल्याचे तसेच मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात ते योग्य प्रमाणात टिकून राहिल्याचे दिसून आले आहे.’’दक्षिण भारतातील कोडाईकॅनलच्या पायथ्याशी प्राचीन नैसर्गिक पद्धतीने कुठल्याही रसायनांचा वापर न करता इन्सुलिन टी पावडरचे उत्पादन केले जाते. ही टी पावडर कोस्टूस इग्नरस वनस्पतीपासून बनवली जाते जी इन्सु‍लिन वनस्पती म्हणून ओळखली जाते.

Share Your Views

Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
  • Attributes
  • Custom attributes
  • Custom fields
Click outside to hide the compare bar
Compare
Wishlist 0
Open wishlist page Continue shopping